breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपचा घरगडी राष्ट्रवादीच्या दारात, उत्तम शहराच्या पदभारासाठी अजितदादांकडे ‘याचना’

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आयुक्त हर्डीकरांनी घेतली भेट
  • राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरीतील आमदाराने केली मध्यस्थी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सिंहासन डळमळीत होताच बदली करून घेण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकरांच्या हालचाली स्पष्ट दिसू लागल्या आहेत. ”भाजपचा घरगडी” म्हणून आयुक्तांना संबोधना-या राष्ट्रवादीच्याच आमदाराने आज बदलीच्या बोलणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयुक्तांची भेट घडवून आणल्याचे बोलले जाते. मुंबई परिसरातील महापालिका अथवा पुण्यासारख्या शहरातील महापालिकेत स्वतःची बदली करवून घेण्यासाठी ”भाजपचा घरगडी” राष्ट्रवादीच्या दारात याचना करत उभा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा निर्धिरित कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे. दोन ते तीन महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांची बदली होणे क्रमप्राप्त आहे. परंतु, कोणत्यातरी दुर्गम आणि दुष्काळी भागातील प्रशासकीय अस्थापनेवर पदभार मिळाल्यास आपली फुका तारांबळ उडणार आहे. त्यापेक्षा शिफारस आणि विनंतीपूर्वक मार्गाने उत्तम आणि मलईदार शहराच्या आस्थापनेवर आयुक्त अथवा अन्य तत्सम पदावर बदली झाल्यास सोयीचे ठरेल, यासाठी आयुक्तांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या पदाधिका-यांच्या भेटीगाठी सुरू केल्याचे समजते. आज थेट त्यांनी अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे अथवा परिसरातील किंवा पुण्यामधील एखाद्या आस्थापनेवर पदभार मिळावा, यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समजते.

राज्यात 105 आमदार निवडून आल्यानंतरही विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की भाजपवर ओढवल्याने आयुक्तांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातच आयुक्त हे नागपूरमधून थेट पिंपरी-चिंचवड मनपात आल्याने त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आयुक्त म्हणून संबोधले जाते. त्यांच्या कार्यकौशल्याचा अंदाज येताच आयुक्त हर्डीकरांना ”भाजपचा घरगडी”, ”भाजपच्या दावणीला बांधलेला बैल”, ”थोतांड अधिकारी”, ”भाजप धार्जिणा अधिकारी”, ”भाजपचा प्रवक्ता” अशा ना-ना प्रकारच्या उपाध्या राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिका-यांनी दिल्या. परंतु, बदलीसाठी हाच घरगडी राष्ट्रवादीच्या दारात उभा करण्याचे पातक राष्ट्रवादीच्या पिंपरीतील आमदाराने केल्याची जोरदार टिका होत आहे.

कामगारांसाठी धन्वंतरी योजनाच कायम ठेवावी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेतली. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची माहिती तयार करावी. त्याबाबतचा ठराव करुन राज्य सरकारला पाठवा. यासह महापालिकेच्या कर्मचा-यांसाठी राबविण्यात येणा-या धन्वंतरी योजनेबाबत कामगार संघटनेच्या निवडणुकीत राजकारण केले जात आहे. धन्वंतरी योजनाच कामगारांसाठी कायम ठेवावी, अशी मागणी शहरातील पदाधिका-यांनी केली. यासंदर्भात पवार यांनी आयुक्तांना सूचना केल्या. यावेळी बैठकीत आयुक्त श्रावण हर्डीकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह नगरसेवक राजू मिसाळ, डब्बू आसवाणी, नगरसेवक जावेद शेख उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button