breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त व्हिडिओ; श्री श्री रविशंकर यांना पोलिसांची नोटीस

पिंपरी |महाईन्यूज|

आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाचे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी नोटीस बजावली आहे.

संभाजी ब्रिगेड या संघटनेने श्री श्री रविशंकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला होता. श्री श्री रविशंकर यांनी युट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओ प्रसारित करुन छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून समर्थ रामदास स्वामी असल्याचे दर्शविल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले आहे. श्री श्री रविशंकर यांना 30 दिवसांमध्ये या नोटीशीचा खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक व्हिडिओ बनवला होता. तो युट्यूबवर प्रसारित करण्यात आला होता. याबाबत कारवाई करावी, यासाठी संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे सातत्याने पाठपुरावा करत होते. श्री श्री रविशंकर यांच्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना यापूर्वी निवेदन दिले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button