breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कुणाल कामरा, ‘लाच’ देण्यासाठी थेट पोहोचला राज ठाकरेंच्या घरी…

मुंबई | महाईन्यूज

पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात त्रस्त केल्याबद्दल कुणाल कामरा याला चार विमान कंपन्यांनी सहा महिने प्रवास बंदी घातलेली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात कॉमेडियन कुणाल कामरा याचीच चर्चा सुरू आहे.

यातच आता कुणाल कामराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘लाच’ देऊ केली आहे. विशेष म्हणजे, कुणाल कामरा थेट राज ठाकरेंच्या घरी गेला आणि लाच म्हणून त्यांच्या आवडीचे मुंबईतील किर्ती कॉलेजजवळील ‘किर्तीचे वडे’ घेऊन गेला. यासंदर्भात कुणाल कामराने स्वतः ट्विट करून सांगितलेले आहे. कुणाल कामराने राज ठाकरे यांना एक पत्र सुद्धा लिहिले आहे. ते ट्विट केले असून यामध्ये राज ठाकरे यांनी वेळ द्यावा, अशी विनंती केली आहे. या पत्रात “मी रिसर्च केले आणि यात तुम्ही मुंबईतील किर्ती वड्याचे मोठे चाहते असल्याचे समजले म्हणून मी तुम्हाला तुमचा आवडता खाद्यपदार्थ ‘लाच’ म्हणून देतो आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल.” असे कुणाल कामराने म्हटलेले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button