breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मदर स्पर्श बेबीमधील ८.७० टक्के हिस्सेदारी आयटीसीने खरेदी केली

मुंबई | प्रतिनिधी  
दैनंदिन वापराच्या विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या आयटीसी लिमिटेडने मदर स्पर्श बेबी केअरमधील ८.७० टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. मदर स्पर्श बेबी केअर ही आयुर्वेदिक आणि वैयक्तिक वापराच्या ऑर्गेनिक वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी आहे.

आई आणि बाळाची देखभाल करणारी उत्पादने निर्माण करणाऱ्या मदर स्पर्श बेबी केअरमधील १६ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा आयटीसीने केली होती. त्यानुसार या कंपनीतील ८.७० टक्के हिस्सेदारी आयटीसीने पहिल्या टप्प्यात खरेदी केली आहे. ही भागीदारी समभागांच्या स्वरूपात खरेदी केली आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित भागीदारी खरेदी केली जाईल, असे आयटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आई आणि बाळासाठी लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणारी मदर स्पर्श ही एक स्टार्टअप कंपनी आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात कंपनीने १५.४४ कोटी रुपयांची उत्पादने विकली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button