ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

अन्यथा नक्कीच प्राचार्यांना काळं फासलं जाईल..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेशहराध्यक्ष रुपेश पटेकर यांचा आयुक्तांना इशारा…

मोरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रगीत गायलंच पाहिजे…

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोरवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रगीत गायले जात नाही. आयुक्तांनी सबंधित घटनेत लक्ष घालून दोषी प्राचार्यावर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नक्कीच प्राचार्यांना काळं फासण्यात येईल, असा इशारा मनसे महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेचे शहराध्यक्ष रुपेश पटेकर यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात पटेकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर कामगार नगरी म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. येथे येणारा कामगार हा मुलांच्या शिक्षणासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये येत असतो. त्यांना चांगले शिक्षण मिळावं व चांगले संस्कार व्हावेत यासाठी कामगार वर्ग आपल्या शहरात वास्तव्य करत असतो. आपल्या शहरातील भोसरी एमआयडीसी, चिंचवड एमआयडीसी तसेच आपल्या शेजारच्याही गावात मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. त्याला अनुसरूनच आपल्या महापालिकेने कामगार कर्मचारी पालकांचे मुले शिकावेत म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था महापालिकेने उभारल्या. गेल्या काही वर्षापासून त्या संस्थेमध्ये भरपूर विद्यार्थी पास होऊन चांगल्या ठिकाणी कामही करत आहेत. पण आत्ता सध्या लाजिरवाणी बाब म्हणजे मोरवाडी आयटीआय येथे राष्ट्रगीत गाईले जात नाही. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व शिक्षण देणाऱ्या संस्थेला भारत सरकारने राष्ट्रगीत हे अनिवार्य केले आहे. तरीही प्राचार्य आणि शिक्षकांना स्वतः भेटून सांगून देखील वेगवेगळ्या कारण देऊन विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत पासून वंचित ठेवण्यात आले आहे.

मा. आयुक्त साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत मा. राजेश पाटील त्यांच्या काळात २०२१ पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयात दररोज राष्ट्रगीत चालू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत त्या पाठपुराव्याला १४ ऑगस्ट २०२२ रोजी मनसेला यश प्राप्त झाले. त्यावेळेस आयुक्त साहेबांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयमध्ये व महापालिकेच्या सर्व कार्यालयमध्ये दररोज राष्ट्रगीत सुरू करण्याचा आदेश दिला. महाराष्ट्रातील दररोज राष्ट्रगीत होणारी पहिली पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ठरली आहे. तरी देखील आज लाजिरवाणी गोष्ट आहे. हा आदेश मोरवाडी आयटीआयलाही दिला गेला होता का नाही याची पाहणी करणे गरजेचे आहे.

महापालिकेच्या आयटीआयचे शिक्षक कोणत्या विदयुत यंत्रणेची वाट पाहत आहेत, ते समजायला तयार नाही. प्रत्येक वेळेस विचारले की कधी चालू होणार राष्ट्रगीत तर त्यांचे उत्तर असते विद्युत विभागाने सिस्टीम बसून दिली नाही. विद्यार्थ्यांना तोंडी राष्ट्रगीत बोलायला लावा पण अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे. खूप लाजिरवाणी बाब आहे. याकडे गंभीरपणे लक्ष देऊन त्वरित राष्ट्रगीत सुरू करावं. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नक्कीच प्राचार्यांना काळं फासण्यात येईल, असे निवेदनात पटेकर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button