breaking-newsपिंपरी / चिंचवड

भोसरीत मोफत -हदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भोसरी येथील ओम हॉस्पिटल व लायन्स क्लब तळबडे प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ह्दयरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर सध्या सुरु असून 10 डिसेंबर दरम्यान रोज सकाळी 10 ते 4 या वेळेत ओम हॉस्पिटल हुतात्मा चौक, आळंदी रोड भोसरी येथे आोजित केले आहे. या शिबिरात पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना ह्दयरोग तपासणी अंर्तगत इसीजी, स्ट्रेस टेस्ट, अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन डॉ. सुनिल अगरवाल यांनी केले आहे. अधिक माहिती साठी किंवा रजिस्ट्रेशनसाठी 91303219766/ 8888825603/ 7774049691 या क्रमांकावर संपर्क करावा.

जर पिवळे व केशरी रेशनकार्ड नसेल तर अ‍ॅन्जिओग्राफी 5000 रुपये, अ‍ॅन्जिओप्लास्टी 60 हजार रुपये आणि बायपास शस्त्रक्रिया 1 लाख 50 हजार रुपये या माफक दरात करण्यात येणार आहे. डॉ. सुनिल अगरवाल एमबीबीएस, एमडी, डीएनबी इंटरनॅशनल कारडीयालॉजिस्ट आहेत. त्यांना अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डीयोलॉजिकडून फेलोशिप देण्यात आले आहे.  भोसरी, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरासोबत संपूर्ण महाराष्ट्रातील गरजुंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे, आवाहन ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक अग्रवाल यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button