breaking-newsमुंबई

अभिनेता अक्षय कुमारकडून मुंबई पोलिसांसाठी फिटनेस सांगणारं घड्याळ गिफ्ट

मुंबई – पर्यावरण मंत्री आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यासोबत तासभर बैठक झाली. यावेळी अक्षय कुमारने मुंबई पोलिसांसाठी fitness- health tracking devices भेट दिली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी फेसबूकद्वारे दिली.

मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत या तिघांची बैठक झाली. जवळपास तासभर ही बैठक चालली. अक्षय कुमारने याआधीही मुंबई पोलिसांना बरच सहकार्य केलं आहे. मे महिन्यात त्याने मुंबई पोलिसांसाठी आर्थिक मदतही जाहीर केली होती. त्यानंतर, आज त्याने fitness- health tracking devices भेट दिल्याने त्याच्यावर पुन्हा कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button