breaking-newsआंतरराष्टीय

काश्मीरमध्ये CRPF च्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १८ जवान शहीद

Pulwama Terrorist Attack:  जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले आहेत. तर १५ जवान या हल्ल्यात जखमी झाले असून जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या लक्ष्य केले. एका दहशतवाद्याने हा आत्मघाती हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधूंद गोळीबार केला. यात १२ जवान शहीद झाले आहेत. तर १५ जवान जखमी झाले आहेत. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला लक्ष्य केले.

Mehbooba Mufti

@MehboobaMufti

Disturbing news coming in from . Twelve of our security personnel have been martyred and several have been injured. No words are enough to condemn the gruesome terror attack. How many more lives will be snuffed out before this madness ends?

२१० लोक याविषयी बोलत आहेत

आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा २०१६ नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, असे वृत्त ग्रेटर काश्मीर या स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे. हल्ल्यानंतर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

https://twitter.com/sajid_ali_mir/status/1096008228033449984

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Manjinder S Sirsa

@mssirsa

My heart goes out to the families of 8 @crpfindia jawans martyred and 12 jawans who have been injured in an IED blast in Pulwama in J&K

I request our Indian govt to shun the path of condemnation and take the route of Surgical Strike once more.

६५ लोक याविषयी बोलत आहेत

गुरुवारी पुलवामा येथील महामार्गावरुन सीआरपीएफचा ताफा जात होता. या ताफ्यात जवळपास २५ बस होत्या. एकूण अडीच हजार जवानांचा हा ताफा होता, असे स्थानिक वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. जम्मूवरुन श्रीनगरला हा ताफा जात होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button