breaking-newsराष्ट्रिय

निष्पक्ष निवडणुकींसाठी सर्वाचे सहकार्य महत्त्वाचे – सुनील अरोरा

निवडणुका खुल्या, सौहार्दपूर्ण तसेच नैतिक वातावरणात घेण्यासाठी राजकीय पक्ष व जनता यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केले आहे. ते देशाचे २३वे निवडणूक आयुक्त आहेत. त्यांनी ओ. पी. रावत यांच्याकडून शनिवारी सूत्रे हाती घेतली.

लोकसभेखेरीज २०१९ मध्ये जम्मू काश्मीर, ओदिशा, महाराष्ट्र, हरयाणा, आंध्र, अरुणाचल प्रदेश व सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अरोरा हे ऑक्टोबर २०२१ पर्यंत या पदावर राहणार आहेत.

अरोरा यांची ३१ ऑगस्ट २०१७ रोजी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. माहिती व प्रसारण, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय या खात्यात त्यांनी सचिव म्हणून काम केले होते. अरोरा हे १९८० च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून त्यांनी अर्थ, कापड उद्योग, नागरी हवाई वाहतूक या खात्यात सह सचिव म्हणून काम केले. १९९९-२००० दरम्यान ते इंडियन एअरलाइन्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक होते. राजस्थानमध्ये त्यांनी ढोलपूर, अलवर, नागौर, जोधपूर येथे काम केले असून ते १९९३-१९९८ दरम्यान मुख्यमंत्र्यांचे सचिव होते. २००५-२००८ दरम्यान ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button