breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणेकरांनी शोधलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये – सुप्रिया सुळे

पिंपरी / महाईन्यूज

संपूर्ण जग फिरून झाल्यानंतर शेवटी कोरोनाची लस आमच्या पुण्यात सापडली. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाही तर कोणीतरी म्हणायचे मीच शोधली. पुण्यामध्येच ही लस निर्माण करण्यात आली आहे. पुणेकरांनी ती लस शोधली. त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी दावा करू नये, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी (दि. 28) नियोजित पुणे दौरा होता. सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोरोनाच्या लसीचा प्रगती अहवाल पाहण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. पुणेकरांनी शोधलेल्या कोरोना लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता टीका केली आहे.

पुण जिल्ह्यातील मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी अशी टिका केली. त्या म्हणाल्या की, तुमच्या येथे 1400 कोटी, 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर एक लाख कोटींच्या गप्पा असतात. या गप्पा कोण मारतं तुम्हाला चांगलं माहीत आहेच. ते आज आपल्या पुण्यात आले आहेत. बघा ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’. जग फिरल्यावर शेवटी लस सापडली आमच्या पुण्यात. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाही तर कोणीतरी म्हणायचे मीच शोधली. पुण्यामध्येच ही लस निर्माण करण्यात आली आहे. पुणेकरांनी ती लस शोधली आहे. त्यामुळे बाहेरून येऊन लसीवर कोणी दावा करू नये, असा इशारा सुळे यांनी दिला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, सरकार कोसळणार, असा पाढा विरोधकांनी लावला आहे. मात्र, आता पुढची पाच वर्षेचं नव्हे तर 25 वर्षे कधी उलटतील, हे कळणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

भाजप नेत्यांनी मोदींकडे ही मागणी आवश्य करावी – रोहित पवार

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यात आगमन झालं. ते मांजरीतील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. ‘सिरम’मध्ये कोरोना लसीचा आढावा घेणार होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं आहे. एवढं नाही तर त्यांच्याकडून एक अपेक्षाही व्यक्त केली आहे. तसेच, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रात (पुणे) हार्दिक स्वागत! या दौऱ्यात राज्यातील भाजपचे नेते पंतप्रधान मोदींना भेटतील. तेंव्हा केंद्र सरकारकडं अडकलेला जीएसटीसह (#GST) इतर सर्व प्रलंबित निधी राज्याला त्वरित देण्याची आजवर कधीही न केलेली राज्याच्या हिताची मागणी ते करतील, ही अपेक्षा!’, असं आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button