breaking-newsताज्या घडामोडीपुणे

उड्डाणपूलावर धोकादायक पध्दतीने कामकाज

पिंपरी : देहूरोड येथील आयुध निर्माणी प्रवेशद्वारापासून पुढे लोहमार्गावर उड्डाणपूल उभारणीसह पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयापर्यंत एलिव्हेटेड रस्ता बांधण्यात येत आहे. मात्र, ही कामे करताना संबंधित कंत्राटदाराकडून येथील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे . यासह उड्डाणपुलाशेजारून ये-जा करणाऱ्या बस, मालवाहू वाहनांना अनेकदा लोखंडी सळया घासल्या जात असून, मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल व बाजारपेठ भागातून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयापर्यंत एलिव्हेटेड रस्ता बांधण्याचे काम रस्ते विकास महामंडळाने एका कंत्राटदारास दिलेले असून गतवर्षी जानेवारी महिन्यात काम सुरू झाले आहे. लोहमार्ग उड्डाणपुलास जोडणाºया भागातील जोडरस्ता व उड्डाणपुलाच्या भरावाचे, तसेच इतर कामे सुरू आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराकड्रून जुना बँक आॅफ इंडिया चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयापर्यंत सिमेंटचे पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. पिलरवर बांधण्यात येणाºया एलिव्हेटेड रस्त्यासाठी टाकण्यात येणाºया सिमेंटच्या टोप्यांचे (कॅप) काम करीत असताना बहुतांश मजूर हेल्मेट न घालता, तसेच कोणतेही सुरक्षापट्टे न बांधता उंचावर कामे करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे .
स्वामी विवेकानंद चौकाजवळ सिमेंट पिलरमधून काही ठिकाणी लोखंडी सळया बाहेर आल्या असून, ये-जा करणाºया वाहनांना घासत आहेत. येथून ये-जा करणाºया एसटी, पीएमपी, तसेच खासगी बसची संख्या अधिक असून, या बसलाही लोखंडी सळया घासत आहेत. चुकून खिडकी उघडी असल्यास लोखंडी सळईमुळे एखाद्या प्रवाशाला गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच पुलाशेजारचा रस्ता अरुंद असल्याने आणखीनच तारांबळ उडते.
उंचावरील कामे करत असताना कामगारांना सुरक्षा बेल्ट, हेल्मेट, बुट, हातमोजे, आदी सुरक्षिततेची साधने पुरविणे हे ठेकेदाराची जबाबदारी असते. मात्र, याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. लोखंड उचलणे, उंचावर वाहतूक करणे यासह वेल्डींग करणे ही जोखमीची कामे कामगारांना करावी लागतात. या वेळी सर्व सुरक्षिततेची साधने पुरविणे आवश्यक असते. यासह कामगार या साधनांचा वापर करतो की नाही याकडेही काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असते. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button