breaking-newsताज्या घडामोडी

कारचा दरवाजा लॉक झाला; चिमुकल्या भावांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू

रायगड – भंगार गोडाऊन शेजारी भंगारात घेतलेल्या बंद होडा सिटी कारमध्ये गुदमरल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. कारचे दरवाजे लॉक झाल्याने या सख्ख्या भावांचा गुरमरुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

सुहेल खान (६) आणि अब्बास खान (४) अशी या दोन मृत भावंडांची नावे आहेत. हे दोघे चिमुरडे संध्याकाळी खेळताना या गाडीत बसले असावे. दरम्यान, गाडी लॉक झाली आणि ती त्या दोघांना उघडता आली नाही. त्यामुळे गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. घरातील आणि परिसरातील लोकांना ही घटना कळताच त्यांनी पोलिसांना कळविले.

महाड शिरगाव येथील साळुंखे रेस्क्यु टीमच्या सहाय्याने कार उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु कार बाहेरुन उघडण्यात अपयश आल्याने अखेर कारच्या काचा फोडून चिमुरड्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तात्काळ दोन्ही चिमुरड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महाड औद्योगिक वसाहत पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button