breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर स्थिर ठेवून डिझेलचे दर वाढवले

गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले होते.मात्र आता तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर स्थिर ठेवून डिझेलचे दर वाढवले आहेत. तेल कंपन्यांनी या महिन्यात डिझेलचे दर नऊ वेळा वाढवले आहेत. दिल्लीत डिझेलची किंमत ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. सातत्याने होणाऱ्या किंमत वाढीमुळे महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

तेल कंपन्यांनी जुलै महिन्यात केवळ डिझेलचे दर वाढवले ​​आहेत. डिझेलच्या दरात १.४५ रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे गेल्या दोन दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. त्याच्या किंमतीत अखेरची वाढ २९ जून रोजी झाली होती, तीदेखील प्रतिलिटर फक्त ५ पैसे.
दिल्लीत पेट्रोलची किंमत ८०.४३ रुपये असताना डिझेल ८१.७९ रुपयांवर गेले. दिल्ली हे देशातील एकमेव असे राज्य आहे जिथे पेट्रोलपेक्षा डिझेल महाग आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कायम आहे. मात्र, मंगळवारीच कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरलपेक्षा एका डॉलरने वाढले आहेत. त्यावेळी दोन्ही इंधनाचे दर सलग चार दिवस स्थिर होते. मात्र, आज डिझेल १५ पैसे प्रति लिटर महाग झाले आहे.


दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजेपासून लागू आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.


तुम्हाला पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर माहिती करून घ्यायची असेन तर, इंडियन ऑईलचे ग्राहक आरएसपी 9224992249 वर SMS लिहून माहिती मिळवू शकतात..तसेच बीपीसीएल ग्राहक आरएसपी लिहून 9223112222 वर SMS करून माहिती पाठवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना एचपीप्राइसला लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button