मनोरंजन
‘कान’मध्ये पोहोचला ‘बाहुबली 2’
मुंबई – प्रभास, राणा डुग्गुबाती, अऩुष्का शेट्टी आणि तमन्ना यांची मुख्य भूमिका असलेला ‘बाहुबली 2’ अटकेपार झेंडे लावत आहे. जगभरात 1500 कोटींची तूफान कमाई करणाऱ्या ‘बाहुबली’ ची लोकप्रियता आता ‘कान’ मध्ये पोहोचली असून या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनींग ठेवण्यात आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही माहिती शनिवारी रात्री दिली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बाहुबली- द बिगिनींग’ या चित्रपटाचे Marche du film सेक्शन मध्ये स्क्रिनींग 20 मे रोजी करण्यात आले आहे. आता त्याच ठिकाणी 21 मे रोजी रात्री 8.30 वाजता ‘बाहुबली – द कन्क्लुजन’ चे स्क्रिनींग ठेवण्यात आले आहे.