breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजन

सुपरस्टार रजनीकांत यांचं विधान चर्चेत; म्हणाले, मला दारूचं व्यसन नसतं तर..

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत यांनी अभिनयाच्या माध्यमातून सर्वांचे मन जिंकले आहे. रजनीकांत यांना देवाचा दर्जा देला जातो. वयाच्या ७२ व्या वर्षीही रजनीकांत नव्या कलाकारांना टक्कर देतना दिसतात. सोबतच त्यांच्या सामाजीक कामामुळेही त्यांची नेहमीच चर्चा असते. नुकतेच त्यांनी रजनीकांत यांनी एका वाईट व्यसनाबद्दल भाष्य केलं आहे.

रजनीकांत म्हणाले की, जर दारूचं व्यसन मला जडलं नसतं तर मी समाजासाठी अधिक चांगलं काम करू शकलो असतो. दारू पिणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. माझ्या भावाने मला तेव्हा बजावलं होतं. दारू माझ्या आयुष्यात नसती तर मी आणखी चांगला माणूस आणि स्टार बनू शकलो असतो. मद्यपान पूर्णपणे सोडा असं माझं म्हणणं नाही, पण रोज मद्यपान करू नका. यामुळे तुमचा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीचं आयुष्य खराब होऊ शकतं. याची सर्वात जास्त झळ तुमच्या पालकांना, कुटुंबाला आणि तुमच्या भोवतालच्या लोकांना बसते.

हेही वाचा – राज्यात डोळ्यांची साथ पसरतेय, अशी आहेत लक्षणे? काय काळजी घ्यावी?

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मी कंडक्टर तेव्हा मी रोज दारू प्यायचो, सिगारेट ओढायचो तसेच नियमित मांसाहारदेखील करायचो आणि हे जे करत नाहीत त्यांची कीव करायचो. पण आता मला वाटतं की या तीनही गोष्टींच्या आहारी जे जातात ते वयाच्या साठीनंतर निरोगी आयुष्य जगू शकत नाहीत, असंही रजनीकांत म्हणाले.

दरम्यान, रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. हा सिनेमा येत्या १० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच आपल्या मुलीने दिग्दर्शित केलेला रजनीकांत यांची महत्वाची भूमिका असलेला ‘लाल सलाम’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button