breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काळेवाडीतील काकास् इंटरनॅशनल स्कूलचा आगळा- वेगळा स्पोर्ट डे

पिंपरी – चिंचवड | महाईन्यूज |मयुरी सर्जेराव|

शाळा म्हटलं की अभ्यास आणि परिक्षा ,नंबर अशाच गोष्टी डोळ्यांसमोर येतात…त्यात आजकालची स्पर्धा पाहता पालक आणि शिक्षक अगदीच विद्यार्थांना अभ्यासात तरबेज करण्याकडे लक्षकेंद्रित करतात आणि खेळांकडे दूर्लक्ष. मात्र यामुळे मुलांच्या मनात अभ्यासाबद्दलची भिती आणि खेळांविषयी रस कमी होऊन जातो. पण काळेवाडीत असलेल्या काकास् इंटरनॅशनल स्कूल मध्ये यापेक्षा वेगऴ वातावरण पहायला मिळत…

या शाळेत मुलांना जास्त खेळाबद्दल जाण व्हावी आणि खेळण्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात…त्याचच उत्तम उदाहरण म्हणजे,आज पार पडलेला या शाळेचा स्पोर्ट डे… आज काकास् इंटरनॅशनल स्कूल चा स्पोर्ट डे पार पडला…या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी मनापासून सहभाग नोंदवला होता…प्ले ग्रुप पासून सर्वच वर्गाचे विद्यार्थी सहभागी झाले होते…आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे प्ले ग्रुप च्या विद्यार्थ्यांंनाही अनेक त्यांच्या कुवतीपेक्षा वेगळे आणि त्यांना चालना देणारे खेळ ठेवण्यात आले होते… प्ले ग्रुप किंवा नर्सरी वर्गात मुलांना शाळेची सवय व्हावी किंवा त्यांच्या मनातील भिती निघून जावी म्हणून पालक त्यांना शाळेत पाठवतात…पण काकास् इंटरनॅशनल स्कूल चे त्यांच्या विद्यार्थ्यांसाठीचे विचार आणि योजना अगदीच निराळ्या तसेच या चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असणारे आहेत…

काका इंटरनॅशनल स्कूल ही पुण्यातील सहावी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पहिली MCF ट्रेनिंग देणारी शाळा आहे.. एवढचं नाही तर या शाळेने त्यांच्या विद्यार्थ्यांना एथलेटिक्स लेवलचे सर्व खेळ शिकवण्याची जबाबदारी घेतलेली आहे…तसेच विद्यार्थ्यांना हॉर्स रायडिंगचं ट्रेनिंग देणारी ही पहिली अशी शाळा आहे…हॉकी, टेनिस,क्रिकेट,फुटबॉल,स्केटींग अशा अनेक खेळांसाठी ही शाळा आपल्या विद्यार्थ्यांना तयार करतेय…

तसेच पालकांनी देखील काकास् इंटरनॅशनल स्कूल च्या सर्वंच उपक्रमांबाबत किंवा शिक्षणाबाबत समाधान व्यक्त केलं आहे…आमचा पाल्याला अभ्यासाव्यतिरिक्त जे आवश्यक आहे ते नक्कीच या शाळेकडून मिळतं आहे…शिक्षकांसह संपूर्ण शाळेची टीम मुलांसाठी मेहनत घेत असल्याचं समाधान पालकांनी व्यक्त केलं आहे.तसेच शाळेने मुलांसाठी ठेवलेल्या स्पोर्ट अकॅडमिचही तितकचं कौतूक केलं…या शाळेला दोन महिनेच झाले असतानाही इतक्या कमी वेळेत या शाळेने पालकांचा जबरदस्त विश्वास संपादन केला आहे…

दरम्यान या आज स्पोर्ट डे च्या निमित्तनं शाळेच्या मुख्याध्यापिका बबिता नायर, शाळेचे ट्रस्टी विनोद तापकिर आणि ज्ञानेश्वर तापकिर , तसेच शाळेचे संचालक चिराग फुलसुंदर यांनी उपस्थिती लावली नाही तर मुलांना आणि पालकांना खेळासाठी प्रोत्साहन देखील दिलं..ते स्वत:हा प्रत्येक खेळात आवर्जून लक्ष देत होते…खेळात जिंकलेल्या विद्यार्थ्यांना, पालकांना मेडल आणि सर्टिफिकेट देऊन स्पोर्ट डेचा समारोप करण्यात आला…काकास् इंटरनॅशनल स्कूल ने आपल्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्पोर्ट अकॅडमी’ या उचलंलेल्या महत्त्वाच्या पावलामुळे या शाळेचा प्रत्येक विद्यार्थ्यी अभ्यासासोबत कोणत्याही खेळात नक्कीच माहिर होईल यात काहीच शंका नाही…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button