breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात प्रायोगिक तत्वावर सहा शाळा बनणार ‘स्मार्ट’

सीईआे तथा आयुक्त श्रावण हर्डिकर यांची माहिती 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे, त्यांना स्मार्ट क्लास रुमसह अन्य सोयी-सुविधा मिळाव्यात याकरिता शहरातील सहा शाळांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे. त्या शाळा सुरुवातीला स्मार्ट सिटीतून प्रकल्पातून स्मार्ट करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे सीईआे तथा आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिली.

महापालिकेतील आयुक्तांच्या दालनात आज (शनिवारी) स्मार्ट सिटी प्रा. लि. कंपनीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कंपनीचे अध्यक्ष नितीन करीर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संचालक प्रमोद कुटे, सचिन चिखले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त हर्डिकर म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्पार्तंगत पॅन सिटीच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. त्या कामासाठी 400 कोटी रुपयाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. तसेच एरिया बेस डेव्हलमेंट यातील कामांचाही आढावा घेण्यात आला. त्यातील दोन प्रकल्पाच्या कामांना मान्यता देण्यात आली. यामध्ये संत तुकाराम नगरच्या वायसीएम रुग्णालयावर आणि निगडीच्या सेक्टर 23 मध्ये साैर उर्जा प्रकल्प राबविणार आहे.

महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ई क्लास रुम, सुसज्ज लॅब, ई काॅम्प्युटर रुम, इंग्लिश स्पिकींग रुम यासह अन्य विविध सोयी सुविधा राबविणार आहोत. सुरुवातील प्रायोगिक तत्वावर सहा शाळा स्मार्ट बनविणार आहे.  यामध्ये पिंपळे गुरवची प्राथमिक शाळा 54, चिंखलीची म्हेत्रेवस्ती शाळा, सांगवीची होळकर शाळा, पिंपळे साैदागर प्राथमिक शाळा 51 आणि पिंपळे गुरव, पिंपळे साैदागरचे माध्यमिक विद्यालयाचा समावेश असणार आहे. महापालिकेच्या 123 शाळा स्मार्ट बनविल्या जाणार आहेत. यामध्ये स्मार्ट क्लास, काॅम्प्युटर लॅब, एसटीईएम लॅब, इग्लिश स्पिकींग लॅंब यासह आदी सुविधा राबविणार आहे. या प्रकल्पात 40 कोटी रुपये खर्च करणार आहे.

तसेच एरिया बेस डेव्हलमेंट प्रकल्पातून शहरात सार्वजनिक ई स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. हे स्वच्छतागृहे महापालिकेच्या बीआरटी मार्गावर, विशेषताः महिलांच्या स्वच्छतागृहे बसविली जाणार आहेत. शहरात 10 कोटी 54 लाखाची विविध ठिकाणी 154 सीट्सची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button