breaking-newsआंतरराष्टीय

चोर कोण हे त्यानंतर ठरवा – विजय मल्या

स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयला ९००० हजार कोटींचा चुना लाऊन देशातून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. लंडनमध्ये वेस्ट इंडिजचा धडकाबाज खेळाडू ख्रिस गेल याने विजय मल्याची भेट घेतली. विजय मल्याच्या भेटीचा फोटो गेलने सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोवर नेटकऱ्यांनी गेल आणि मल्याला चांगलेच ट्रोल केले. विजय मल्यानेही गेलने पोस्ट केलेल्या फोटोला रिट्विट करत खास मेसेज लिहिला आहे. यामध्ये तो म्हणतोय की, गेल्या वर्षाभरापासून मी बँकला पैसे द्यायला तयार आहे. गेल्या वर्षभरापासून मी बँकेला सर्व पैसे द्यायला तयार आहे. बँक पैसे का घेत नाही, हे त्यांनाच विचारा आणि त्यानंतर तुम्हीच ठरवा नेमकं चोर कोण आहे.

इंग्लंडमध्ये सध्या विश्वचषकाचा थरार सुरू आहे. वेस्ट इंडिज संघाचे स्पर्धेत आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. त्यानंतर युनिव्हर्स बॉसने विजय मल्याची भेट घेतली. या भेटीनंतर गेलने ट्विटरवर दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच त्याने काही ओळीही लिहिल्या आहेत. तो म्हणतो की, बिग बॉसला भेटल्याचा आनंद आहे. गेलने हा फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केलं आहे.

विजय मल्यानेही गेलच्या या फोटोला रिप्लाय दिला आहे. तो म्हणतो की, ‘ माझा मित्र आणि युनिव्हर्स बॉसला भेटून आनंद झाला आहे.’ विजय मल्या इतक्यावरच थांबला नाही. त्यानं इथंही आपण चोर नाही आणि भारतील बँकाला फसवूण पळालो नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणतो, ‘मला काहीजण चोर म्हणतात. पण त्यांनी आपल्या बँकाना विचारावे, गेल्या वर्षभरापासून मी सर्व पैसे द्यायला तयार आहे. त्यांना वारंवार तशी विनंतीही केली. मात्र, बँक पैसे का घेत नाही. त्यानंतरच मला चोर म्हणायचा निर्णय घ्यावा.’

विश्वचषकात आव्हान संपल्यानंतर विंडिजचे काही खेळाडू अद्याप इंग्लंडमध्येच आहेत. यादरम्यान, फॉर्मुला वन पहायला गेलेल्या गेलची आणि विजय मल्याची भेट झाली. या भेटीचा फोटो गेलने ट्विटरवर पोस्ट केला. गेलने फोटो पोस्ट केल्यानंतर भारतीयांनी त्याला ट्रोल केलं. विजय मल्याला कुरियरने भारतात पाठवण्याचा सल्लाही दिला.

Chris Gayle

@henrygayle

Great to catch up with Big Boss @TheVijayMallya cheers 🥂 👌🏿

View image on Twitter

Vijay Mallya

@TheVijayMallya

Great to catch up with the Universe Boss and my dear friend. For all those of you losers who call me CHOR, ask your own Banks to take their full money that I am offering for the past one year. Then decide on who is CHOR.

467 people are talking about this

दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाने मल्याच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईला परवानगी दिली होती. त्या विरोधात मल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आर्थिक फरारी गुन्हेगार कायद्याअंतर्गत विशेष न्यायालयाने मल्याला आर्थिक फरारी गुन्हेगार जाहीर केले आहे. या निर्णयाला व कायद्याच्या वैधतेला मल्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर निर्णय येईपर्यंत मालमत्ता जप्तीच्या कारवाईस स्थगिती द्यावी, अशी मागणी मल्याने केली होती. न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि न्यायमूर्ती शारूख काथावाला यांच्या खंडपीठाने गुरूवारी मल्या याची ही विनंती फेटाळली. या प्रकरणी त्यांना दिलासा देण्याचे काहीच कारण नाही, असेही न्यायालयाने  नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button