breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सर्वसामान्यांना फटका! घरगुती अनुदानित सिलेंडर २५ रुपयांनी महागला

नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच इतके वाढले असताना आता सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीही वाढवल्या आहेत. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. १४ किलोच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात २५ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी आता घरगुती अनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी ८३४ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत.

सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. याआधी १ मे रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. तर एप्रिल महिन्यात १० रुपयांनी दर कमी करण्यात आले होते. तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये हे दर वाढले होते. दरम्यान या वर्षभरात एलपीजी सिलेंडरच्या दरात एकूण १४० रुपयांची वाढ झाली आहे. यासह राजधानी दिल्लीत आज १४.२ किलोच्या सिलेंडरसाठी ८०९ ऐवजी ८३४ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत. तर मुंबईतही इतकेच पैसे मोजावे लागणार आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button