breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मी बारामतीकर अभियानातून ‘तुफान आलंया’, अजित पवाराकडून श्रमदान

  • रोहीत पवार, सुनेत्रा पवारही सहभागी

पुणे  –  बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या ‘मी बारामतीकर’ अभियानातून आज तालुक्यातील 15 गावांमध्ये महाश्रमदान सोहळा आयोजित करण्यात आला. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत तब्बल 1800 घनमीटर खोदकाम केलं. त्यामुळे येत्या काळात बारामतीच्या जिरायत भागांची पाणी समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे.

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी, भिलारवाडी, जराडवाडी, चौधरवाडी, जळगाव सुपे, देऊळगाव रसाळ, नारोळी, सायबाची वाडी, सुपे, दंडवाडी, सिध्देश्वर निंबोडी, मोढवे, मुर्टी या गावामंध्ये आज महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले. जिरायती गावाच्या दुष्काळमुक्तीला गावापासून ते शहरापर्यंत साऱ्यांचाच हातभार लागावा व गावकऱ्यांना पाठबळ मिळावे या हेतूने झालेल्या या महाश्रमदानात तालुक्यातीलहजारो श्रमदात्यांनी सहभाग घेतला. आज तीन तासांत झालेल्या महाश्रमदानात १८०० घनमीटर खोदकाम करण्यात आले, ज्यातून पहिल्या पावसात एकावेळी तालुक्यात एवढे पाणी साठणार आहे.

आजच्या महाश्रमदानासाठी गेल्या वीस दिवसांपासून नियोजन सुरू होते. या नियोजनात अगदी प्रत्येक गावांत अधिकाधिक श्रमदाते नियोजनपूर्वक जातील व कोणत्याही गावात किमान दीड हजारांपेक्षा संख्या कमी राहणार नाही याची काळजी घेतली जात होती. एकाच दिवशी एकाच वेळी 15 गावांत हजारोंनी टिकाव, खोरी हातात घेऊन खोदलेले सलग समतल चर येणाऱ्या पावसाळ्यात पहिल्याच पावसात त्या गावाला आश्वासक दिलासा देतील या दृष्टीने केलेले हे नियोजन प्रथमदर्शनी यशस्वी ठरले.

आजच्या या महाश्रमदानात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, महाश्रमदानाच्या आयोजक सुनंदा पवार यांनी स्वतःही यामध्ये सहभाग घेतला. अजित पवार यांनी जराडवाडी येथे भेट देऊन श्रमदान केले व सहभागी श्रमदात्यांचे कौतुक केले. राजेंद्र पवार यांनी सायंबाचीवाडी येथे श्रमदान केले. रोहित पवार यांनी 15 गावांना भेटी देत युवकांबरोबर श्रमदान करीत स्वयंसेवकांचे कौतुक केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button