breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेसशी कोणत्याही राज्यात आघाडी नाही – मायावती

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेससमवेत कोणत्याही राज्यामध्ये निवडणूक आघाडी करण्यात येणार नाही, असे बसपाच्या नेत्या मायावती यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केल्याने विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या प्रयत्नांना चांगलाच हादरा बसला आहे.

बसपा कोणत्याही राज्यामध्ये काँग्रेसशी आघाडी करणार नाही, असे आपण पुन्हा एकदा स्पष्ट करीत असल्याचे मायावती यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सपाशी करण्यात आलेली निवडणूकपूर्व आघाडी परस्परांबाबतचा आदरभाव आणि प्रामाणिक हेतूने करण्यात आली आहे. ही आघाडी भाजपचा विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये पराभव करण्यास पुरेशी आहे, असेही मायावती यांनी म्हटले आहे.

बसपाशी आघाडी करण्यास अनेक पक्ष उत्सुक आहेत, मात्र केवळ राजकीय लाभासाठी आपला पक्ष तसे करणार नाही, कारण त्यामुळे बसपाच्या चळवळीला धक्का पोहोचू शकतो, असेही मायावती म्हणाल्या. उत्तर प्रदेश वगळता विविध राज्यांतील पक्षाच्या नेत्यांशी त्या बोलत होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button