breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यात आजपासून लालपरी धावण्यास सुरुवात

सातारा | लॉकडाउनच्या काळात बंद असलेली लालपरी शुक्रवार पासून रस्त्यांवर धावणार आहे. अमरावती जिल्हांतर्गत प्रवाशांच्या सेवेसाठी हि सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती विभागाने उपलब्ध करून दिली आहे. अमरावती जिल्ह्यांतर्गत सहा आगारांतर्गत या बसेस धावणार आहेत.

अमरावती महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अमरावती व बडनेरा हे दोन बस आगार सोडून उर्वरित परतवाडा,दर्यापूर,चांदुर रेल्वे, वरुड, मोर्शी आणि चांदुर बाजार या बस आगारांमधून वाहतूक प्रवासी आसन क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांसह हि बस वाहतूक सुरु होणार आहे. सहा आगारांमधून नियोजित 547 बस फेऱ्या करण्यात येणार आहेत. यासाठी 112 चालक आणि वाहक त्यांची नियुक्ती विभागामार्फत करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ज्या बसेस उभ्या होत्या त्या सर्व बसेस दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे जी बसेस सोडण्यात येणार आहेत त्या सर्व बसेस सॅनिटाइज करण्यात आल्या आहेत. एका बसमधे फक्त 22 प्रवासी प्रवास प्रवास करू शकतील. जो प्रवासी 65 वर्षापेक्षा जास्त व दहा वर्षाच्या आत असलेल्या अशा प्रवासाला बसमध्ये प्रवास करण्यासाठी अनुमती दिली जाणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button