breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

काँग्रेसचे प्रवक्ता राजीव त्यागी यांचे निधन

नवी दिल्ली | काँग्रेसचे प्रवक्ता राजीव त्यागी यांचे निधन झाले आहे. राजीव त्यागी यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांना तातडीने गाझियाबादच्या यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजीव त्यागी हे काँग्रेसचे तरुण आणि तडफदार प्रवक्ता म्हणून प्रसिद्ध होते.

विविध वृत्तवाहिन्यांवर ते आपल्या पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडत असत. आज संध्याकाळी एका वृत्तवाहिनीवरील डिबेट शोमध्ये भाग घेतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळात त्याचा मृत्यू झाला. काँग्रेसचे सचिव डॉ, विनीत पूनिया यांनी ही माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button