breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

शिवसेनेकडून राज्यसभेच्या  ‘सहाव्या’ जागेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांना संधी?

  • शिवसेना नेते संजय राऊत आला शब्द खरा करणार?
  • शिरुर लोकसभा मतदार संघात चर्चेला उधाण

 

पुणे । विशेष प्रतिनिधी

कोणी कितीही आकडेमोड करुदे, शिवसेना राज्यसभेची सहावी जागा लढवणार… असा दावा शिवसेनेचे ‘फायरब्रँड’ नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सहावे खासदार आढळराव पाटीलच असतील, असा अंदाज बांधला जात आहे. त्याला कारणही तसेच आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी जाहीरपणे शिरुरच पुढचा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, अशी घोषणा केली होती. यावर शिरुरमधील जागेवरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पेटणार अशी स्थिती निर्माण झाली. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेत, संजय राऊत यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित केला होता.

दरम्यान, शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेत आघाडीवर असलेले आणि संकटमोचक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असलेले संजय राऊत आता अजित पवारांच्या शाब्दीक हल्ल्याला कृतीतून उत्तर देतील, अशी चर्चा आहे. किंबहूना, ‘मातोश्री’वर तशी खलबतंही सुरू आहेत, असे खात्रीलायक वृत्त आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार झाली. लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना उमेदवारी निश्चित असते. मावळातून युवा नेते पार्थ पवार यांना संधी मिळणार हेही नाकारता येणार नाही. आता शिरुर मतदार संघातून डॉ. अमोल कोल्हे यांचे तिकीट कापणे राष्ट्रवादीला शक्य होणार नाही. कारण, डॉ. कोल्हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत. आता शिरुरमधला वाद शमवण्यासाठी राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना ‘सहावा’ खासदार शिरुरमधून देईल. यासोबत आढळराव पाटील यांच्यासारखा तगडा नेता पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रीय करुन विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकद वाढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चूरस…

राज्यातील बदललेल्या समिकरणांनुसार भाजपचे (BJP) दोन उमेदवार व शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचा (Congress) प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. शिवसेनेने सहाव्या जागेवर दावा केल्यानंतर संभाजीराजेंनी राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला. तर आता भाजपही तिसरा उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत असल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे.राज्यसभेच्या रिक्त झालेल्या 6 जागांसाठी राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून सहा जागांसाठी चुरस रंगलेली पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच पाहायला मिळत असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.कोणी कितीही आकडेमोड करा. सहावी जागा शिवसेनाच लढवेल, असं मोठं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. कोणी कितीही आकडेमोड करावी, आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे आणि जितेंगे, असा विश्वासही संजय ऊतांनी व्यक्त केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button