breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काँग्रेसचा आधारस्तंभ कोसळला, राहुल गांधी हळहळले

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. आज पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभरात काँग्रेसची पिछेहाट होत असताना त्यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘हा एक दु: खद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. पक्षाच्या सर्वात कठीण काळात ते पक्षासोबत उभे होते, त्यांनी काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. फैजल, मुमताज आणि पटेल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत.’

तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्विटरवरून अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अहमदजी केवळ अनुभवी सहकारी नव्हते, मी नेहमीच त्यांच्याकडून सल्ले घ्यायचे. ते नेहमीच खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.’

दरम्यान अहमद पटेल यांना एका महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचे आरोग्य ढासळले होते. जास्त त्रास सुरू झाल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. उपचार सुरू असतानाच आज पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button