breaking-newsपिंपरी / चिंचवड

कष्टकरी कामगार पंचायतीच्या अन्नछत्रास माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांची भेट

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

रिक्षाचालक टेम्पोचालक बस, ट्रक, टेम्पोचालक धुणी-भांडी  स्वयंपाक साफ सफाई कामगार महिला कागद-काच-पत्रा वेचक महिला बांधकाम मजूर हमाल माथाडी कामगार आदी गोरगरीब घटकांसाठी कष्टकरी कामगार पंचायत वतीने पिंपरी येथे अन्नछत्र सुरू केले असून या ठिकाणी रोज असंघटित कामगारांना दोन वेळचे जेवण दिले जात आहे. यामध्ये भात, भाजी, चपाती, वरण अशा प्रकारचा मेनू आहे. गेले अनेक दिवसांपासून हे अन्नछत्र सुरू असून याठिकाणी अनेक मजूर या योजनेचा लाभ घेत आहेत.

आज महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी अन्नछत्र भेट देऊन गोरगरिबांसाठी सुरू असलेल्या अन्नछतत्रास भेट दिली आणि  पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक अभय छाजेड, महामात रमाई भीमराव आंबेडकर पूर्णकृती पुतळा समितीचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, संदीपान झोबडे,  कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे आदी उपस्थित होते.
 

यावेळी रमेश बागवे म्हणाले की, कोरोनामुळे सर्वत्र असून लॉकडावून असून गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांची उपासमार होत आहे. या घटकांना आधार देण्याची आणि त्यांना या सर्व दुःखातून बाहेर काढून त्यांना मदत करण्याची खरी गरज आहे. कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून अन्नछत्र चालू आहे.  हे अत्यंत चांगलं काम सुरू असून शहरातील गोरगरीब नागरिकांना या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button