breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

अभिनेत्री पायल रोहतगीला अटक; नेहरूंविषयी वादग्रस्त व्हिडीओ केला पोस्ट

वादग्रस्त विधान करणारी अभिनेत्री पायल रोहतगी एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याविषयीचा एक व्हिडीओ पायलनं तयार केलेला होता. याप्रकरणात राजस्थान पोलिसांनी तिला अटक केली आहे. याची माहिती स्वतः पायलनं ट्विटरवरून दिलेली आहे. अभिनेत्री पायल रोहतगीने मोतीलाल नेहरू यांच्याविषयी एक वादग्रस्त व्हिडीओ तयार केलेला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता. याप्रकरणी राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायल रोहतगी विरूद्ध तक्रार दाखल दिली होती. त्यानंतर आयटी कायद्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1206074851276083200

त्यानंतर राजस्थान पोलिसांनी रविवारी गुजरातमधील अहमदाबाद येथून तिला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर पायल रोहतगीने स्वतःच्या ट्विटरवरून अटक झाल्याची माहिती दिलेली आहे. “राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्यावर व्हिडीओ बनल्याच्या प्रकरणात अटक केली आहे. हा व्हिडीओ मी गुगलवरून मिळालेल्या माहितीनुसार बनवलेला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मस्करी झाली आहे,” असं रोहतगीनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे हे ट्विट गृहमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग केलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button