breaking-newsमनोरंजन

कलाकारांना कसला धर्म- प्रियदर्शन जाधव

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री झायरा वसीम हिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी झायराला पाठिंबा दिला आहे. तर मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधव याने देखील त्याचे मत मांडले असून एक प्रश्न उभा केला आहे.

एका वृत्तवाहिनीसह झालेल्या मुलाखतीमध्ये झायरा वसीमने बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयावर प्रियदर्शन आणि भाऊ कदम यांनी देखील त्यांची मते मांडली आहेत. दरम्यान ‘कलाकारांना कसला धर्म’ असा प्रश्न प्रियदर्शन जाधव यांने उभा केला आहे.

‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झायराने कमी वयात आपली ओळख निर्माण केली. पाच वर्षांपूर्वी तिने अभिनयविश्वात पदार्पण केले होते. ‘हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते,’ असे तिने लिहिले होते. या पोस्टमध्ये तिने कुराणचाही उल्लेख केला. झायराने ही पोस्ट कोणाच्यातरी दबावाखाली येऊन लिहिली असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Omar Abdullah

@OmarAbdullah

Who are any of us to question @ZairaWasimmm’s choices? It’s her life to do with as she pleases. All I will do is wish her well & hope that what ever she does makes her happy.

१,७९९ लोक याविषयी बोलत आहेत

झायराने ‘दंगल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचंही भरपूर कौतुक झाले. आमिर खानने अनेकदा तिच्या अभिनयकौशल्याची स्तुती केली आहे. अभिनयातील इतके चांगले करिअर पुढे असतानाही तिने अचानक हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

झायराने नुकतीच ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. यामध्ये तिच्यासोबत प्रियांका चोप्रा व फरहान अख्तर झळकणार आहेत. कदाचित पडद्यावरचा हा तिचा शेवटचा चित्रपट ठरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button