breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

कर्नाटक व गोव्यापेक्षाही महाराष्ट्रातील बंदरे सर्वाधिक प्लास्टिकग्रस्त

महाईन्यूज |

कर्नाटक व गोव्याच्या सागरी बंदरांपेक्षा महाराष्ट्रातील बंदरांवर प्लास्टिक प्रदूषण अधिक आहे असे एका अभ्यासात दिसून आले आहे. या प्लास्टिकचे स्वरूप ‘सूक्ष्म’ व ‘स्थूल’ प्लास्टिक असे आहे. सागर किनारी असलेल्या प्लास्टिक उद्योगांमुळे हे प्रदूषण होत असून त्यात पर्यटनामुळे भर पडतच आहे.गोव्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील बंदरांवर भरतीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक घटक दिसून आले आहेत त्या तुलनेत कर्नाटक व गोव्यातील बंदरांवर हे प्रमाण कमी होते. महाराष्ट्रातील बंदरानजीक पेट्रोलियम उद्योग, प्लास्टिक उद्योग आहेत शिवाय पर्यटकही मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक कचरा टाकत असतात. त्यामुळे हे प्रदूषण जास्तच आहे.

‘अ‍ॅसेसमेंट ऑफ मॅक्रो अँड मायक्रो प्लास्टिक अँलाँघ दी वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया- अ‍ॅबंडन्स, डिस्ट्रीब्यूशन, पॉलिमर टाइप अँड टॉक्सिसिटी,’ हा संशोधन अहवाल नेदरलँडस येथील ‘केमोस्फिअर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेला आहे. सूक्ष्म व स्थूल प्लास्टिक घटकांचे निरीक्षण गेली दोन वर्षे पश्चिम भारतातील दहा किनाऱ्यांवर करण्यात आले व त्याचे सागरी जीवांवर होणारे विषारी परिणामही तपासण्यात आले आहे. प्लास्टिक प्रदूषक घटकात रंगीबेरंगी प्लास्टिक घटक सापडले असल्याचे एनआयओच्या वैज्ञानिक महुआ साहा व दुष्यमंत महाराणा यांनी म्हटलेले आहे. प्लास्टिक जर लांबीला पाच मिलीमीटरपेक्षा कमी असेल तर त्याला सूक्ष्म प्लास्टिक म्हणतात व त्यापेक्षा मोठय़ा आकाराच्या प्लास्टिकला स्थूल प्लास्टिक घटक असे म्हणतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button