breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी राम खांडेकर यांचं निधन

मुंबई |

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी राम खांडेकर याचं काल रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या मूळ गावी म्हणजे नागपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मुकूल, सून संगीता, दोन नातवंडं असा परिवार आहे. खांडेकर यांनी देशाचे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे विशेष अधिकारी म्हणून काम केलं होतं. त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणूनही ते कार्यरत होते.

१९८५ साली नरसिंह राव यांनी त्यांचा रामटेक मतदारसंघाच्या नियोजनाची जबाबदारी खांडेकर यांच्याकडे सोपवली होती. १९९१ मध्ये जेव्हा नरसिंह राव पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांचे विशेष अधिकारी म्हणून खांडेकर यांची नियुक्ती झाली. खांडेकर यांनी राव यांच्या निधनापर्यंत त्यांच्यासोबत काम केलं. खांडेकर यांनी अनेक वर्तमानपत्र आणि मॅगझिन्समध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे लेखही लिहिले. अनेक दिवाळी अंकांसाठी त्यांनी त्यांच्या कामाबद्दल आणि अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटींसंदर्भातले ६० ते ७० लेख लिहिले. राजकारण क्षेत्रासंदर्भातल्या त्यांच्या जवळपास पाच दशकांच्या अनुभवांबद्दल ते लोकसत्तामध्ये स्तंभलेखनही करत होते. २०१९ साली हे सर्व लेख ‘सत्तेच्या पडछायेत’ या पुस्तकाच्या रुपात प्रकाशित करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button