breaking-newsराष्ट्रिय
कर्नाटक विधानसभा निवडणूक : १७ मे रोजी मी शपथ घेणार – येडीयुरप्पा
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. २२२ जागांसाठी मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. काँग्रेस, भाजपा आणि जनता दल सेक्यूलर अशी तिरंगी लढत याठिकाणी पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस.येडीयुरप्पा यांनी देखील मतदान केले.
दरम्यान, यावेळी प्रसिद्धी माध्यमांसोबत संवाद साधताना येडीयुरप्पा म्हणाले की, सिद्धरामय्या सरकारमुळे जनता त्रस्त झाली आहे. मात्र, यावेळी जनता आमच्यावर विश्वास दाखवणार आहे. १५० हून अधिक जागांवर आम्ही विजय प्राप्त करू आणि १७ मे रोजी मी शपथ घेणार, असा विश्वास यावेळी येडीयुरप्पा यांनी व्यक्त केला.