breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकातील १४ बंडखोर आमदारांवर विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रतेचा ठपका

कर्नाटकातील राजकीय नाट्याचा आता दुसरा अंक सुरू होत असल्याचे दिसत आहे. अनेक राजकीय घडामोडीनंतर कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएसला सत्तेतून पाय उतार व्हावे लागल्यानंतर, भाजपाने राज्यातील सत्तेची सूत्रं हाती घेतली खरी, मात्र भाजपाला देखील ही सत्ता एवढ्या सहजासहजी टिकवता येणे शक्य होणार नसल्याचे दिसत आहे. बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएसचे – ३ व काँग्रेसचे – ११ अशा १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. तर यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी ३ आमदारांना अपात्र घोषित केले होते. त्यामुळे आता अपात्र आमदारांची संख्या एकूण १७ झाली आहे.

ANI

@ANI

Karnataka Speaker also disqualifies another rebel Congress MLA Shrimant Patil. Total of 14 MLAs including Roshan Baig, Anand Singh, H Vishwanath, ST Somashekhar disqualified https://twitter.com/ANI/status/1155362911382102016 

ANI

@ANI

Karnataka Speaker KR Ramesh Kumar: 13 MLAs(rebel Congress-JDS MLAs) have been disqualified.

View image on Twitter
७७ लोक याविषयी बोलत आहेत

बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई केल्यानंतर विधनासभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी सांगितले की, मी कोणताही चालूपणा अथना नाटक केलेले नाही, उलट अत्यंत सौम्यरित्या निर्णय घेतला आहे.  शिवया १५ व्या विधानसभेची मुदत संपेपर्यंत अपात्र आमदार निवडणूक लढवू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकूण अपात्र आमदारांची संख्या १७ झाल्यानंतर आता कर्नाटक विधानसभेची सदस्य संख्या २०७ झाली आहे. यानुसार बहुमातासाठी १०४ आमदारांची आवश्यकता आहे. भाजपाकडे सद्यस्थितीस १०५ आमदारांचे पाठबळ आहे.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना सोमावारी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र त्या अगोदरच विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांबाबत घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. या अगोदर काँग्रेस-जेडीएसच्या १७ आमदारांनी बंडखोरी करत पक्षांकडे राजीनामे सादर केल्याने अल्पमतात आलेल्या कुमारस्वामी सरकारला बहुमत गमवावे लागले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button