breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा; भाजपाची मागणी

कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसच्या ८ आणि जेडीएसच्या ३ आमदारांनी राजीनामा दिला आहे. अपक्ष आमदार आणि मंत्री नागेश यांनीही राजीनामा दिला आहे. आता त्यांनी बहुमत गमावले आहे, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारत कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाच्या नेत्या शोभा करंदलाजे यांनी केली आहे. शनिवारपासूनच कर्नाटकच्या राजकारणात उलथापालथ सुरू आहे.

११ आमदार राजीनामा मागे घेण्यास तयार नाहीत त्यामुळे कर्नाटक सरकार अडचणीत आलं आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या शोभा करंदलाजे यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कुमारस्वामींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कुमारस्वामी यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे असं त्या म्हटल्या आहेत.

ANI

@ANI

BJP leader Shobha Karandlaje outside BS Yeddyurappa’s residence in Bengaluru: Karnataka CM HD Kumaraswamy should resign immediately. He has lost the majority. Congress MLAs have already resigned. He should make way for another govt.

35 people are talking about this

 

ANI

@ANI

Karnataka BJP leader Shobha Karandlaje: We welcome Independent MLA Nagesh (who resigned as minister). We will accept anybody into our party who is from non-political dispensation. We’re not in touch with any rebels of the Congress and JD(S), as long as they are with their parties

33 people are talking about this

दरम्यान अपक्ष आमदार नागेश यांनी भाजपात प्रवेश केल्याचीही माहिती करंदलाजे यांनी दिली आहे. आम्ही काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या संपर्कात नाही असंही शोभा करंदलाजे यांनी म्हटलं आहे. कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात फाटाफूट झाल्यानंतर यामागे भाजपा आहे असा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र भाजपाने या संदर्भात कानावर हात ठेवले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button