breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कर्तव्यात कसूर केल्याने पुण्यात तेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर शिक्षेची कारवाई

पुणे | महाईन्यूज

वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना लाच प्रकरणासारख्या गंभीर स्वरुपाच्या दखलपात्र गुन्हा दाखल करुन अखत्यारीतील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात व पर्यवेक्षण करण्यात अपयशी ठरणे, गंभीर घटनांचे गांभीर्य ओळखून तात्काळ दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे निर्देशन न देणे, पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात अपयश, वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवर गुन्ह्याची प्रगतीची माहिती न देता उद्धटपणे संभाषण करणे, वैयक्तिक मानसिक त्रासातून कंट्रोल रुमवरील व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर आत्महत्या करीत असल्याचा संदेश पाठविणे अशा विविध कारणावरुन पोलीस आयुक्त डॉ़ व्यंकटेशम यांनी शहरातील १३ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षकांवर शिक्षेची कारवाई केलेली आहे.

त्यात एक ते दोन वर्षे वेतनवाढ रोखणे, सक्त ताकीद देणे, समज देणे अशा शिक्षांचा समावेश आहे़. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांवर कारवाई केल्याने संपूर्ण शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दखलपात्र गुन्हा असताना हेतू पुरस्पर दुर्लक्ष केल्याने उपनिरीक्षकाने तक्रार अर्ज प्रलंबित ठेवला़ त्यात साडेपाच लाख रुपयांचा स्वीकार पोलिसांनी केला़. याचा तक्रार अर्जात उल्लेख असताना साक्षीदारांकडून प्राथमिक चौकशीत पुष्टी मिळाली आहे़, अशा प्रकरणात कमकुवत पर्यवेक्षण, बेजबाबदार व बेशिस्त वर्तनामुळे बातमी प्रसिद्ध होऊन पोलीस दलाची प्रतिमा मलीन होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल तत्कालीन एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची दोन वर्षे वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षेचा आदेश देण्यात आलेला आहे.

नुकताच तुरुंगात असतानाही कोर्टतारखेला आला असताना सराईत गुन्हेगाराने पत्नीच्या मदतीने कट रचून काही जणांवर हल्ला करुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता़ सिंहगड रोड परिसरातील या गुन्ह्यातील आरोपी बंटी पवार याने यापूर्वी गेल्या वर्षी दोघांवर कोयत्याने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले होते़. त्या प्रकरणात घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा आदेश देणे अपेक्षित होते़. तसेच आरोपी हा जामिनावर सुटलेला आहे, हे माहिती असताना कारवाई केली नाही़. त्यामुळे या घटनेचे पडसाद उमटून २० ते २५ जणांच्या टोळक्यांनी परिसरातील लोकांच्या मालमत्तेचे नुकसान केले़ दहशत निर्माण झाली़ त्यामुळे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची एक वर्षे वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देण्यात आली आहे़.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button