ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

अखेर राज ठाकरे यांना अखेर मास्क लावावा लागला, नेमकं काय घडलं पाहा

पुणे: पुणे दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. संपूर्ण दौऱ्यात विनामास्क दिसलेले राज ठाकरे बाबासाहेबांच्या भेटीवेळी मात्र मास्क घालून होते. त्यामुळे दोघांच्या भेटीसोबतच राज ठाकरेंनी घातलेल्या मास्कचीही सर्वत्र चर्चा रंगली होती.

 

राज्यात करोनाने शिरकाव केल्यानंतर या संकटासोबतच कोविड नियमांचे बंधनही सर्वांवर आले. यात मास्क सर्वांनाच बंधनकारक करण्यात आलेला आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या नियमाला नेहमीच फाटा दिल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला मास्क न लावता राज गेले होते. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यातही राज यांच्या तोंडावर मास्क नव्हता. मी मास्क लावणार नाही, अशी भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मात्र राज यांच्यावर मास्क लावण्याची वेळ आली आणि राज यांच्या तोंडावर मास्क पाहून सगळेच अवाक् झाले.

 

राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुण्यातील पर्वती परिसरात असलेल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी मंगळवारी राज ठाकरेंनी ही भेट घेतली. बाबासाहेब पुरंदरे पुढच्याच आठवड्यात वयाची 99 वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचं वयोमान आणि संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज ठाकरेंनी मास्क लावत काळजी घेतल्याचं दिसतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button