breaking-newsमनोरंजन

करीनाने पहिल्यांदाच दिली ऑडिशन

करीना कपूरने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केल्याला 19 वर्षे झाली आहेत. इतक्‍या वर्षांच्या करिअरमध्ये तिला कधीही ऑडिशन देण्याची गरज भासली नव्हती. मात्र आता “लाल सिंह चढ्ढा’च्या कास्टिंगसाठी तिला पहिल्यांदाच ऑडिशन देण्याची वेळ आली आहे. “लाल सिंह चढ्ढा’ हा हॉलिवूडमधील 1994 मधील “फॉरेस्ट गंप’ या सिनेमाचा हिंदी रिमेक असणार आहे. या सिनेमामध्ये लीड रोल हॉलिवूडचा ऍक्‍टर टॉम हॅक्‍स होता.

आता सिनेमाचा नायक “मिस्टर परफेक्‍शनिस्ट’ आमिर खान असल्यामुळे त्याला आपल्या सर्व गोष्टी अगदी 100 टक्के परिपूर्ण हव्या होत्या. त्यामुळे त्याने करीनाला ऑडिशन द्यायला लावली. आपल्याला ऑडिशन द्यायला लागल्यामुळे करीना थोडी नाराज झाली होती. पण सैफ अली खानने तिची समजूत काढली. ऑडिशन द्यायला लागण्यात काहीही वाईट नाही. अल पचिनो यांनही ऑडिशन द्ययल्‌ लागली होती.

जर आपण कलाकार आहोत, तर कलाकारांप्रमाणे वागलेही पाहिजे, असे सैफ म्हणाला होता. करीनाल त्याचे म्हणणे पटले आणि तिने ऑडिशन देण्याची तयारी दर्शवली. आमिरबरोबर तिने “थ्री इडिएटस’मध्ये काम केले आहे. त्यामुळे तो किती परफेक्‍शनिस्ट आहे, याची तिला कल्पना आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button