breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

करण जोहरच्या पार्टीचा ‘तो’ व्हिडीओ खरा, फॉरेन्सिक तपासात उघड

मुंबई | बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीचा तो व्हिडीओ खरा असल्याचा धक्कादायक बाब फॉरेन्सिक तपासात उघड झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांच्याही अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

या व्हिडीओनंतर करण जोहरने ही फक्त कौटुंबिक पार्टी होती. त्यात कोणतेही ड्रग्सचे सेवन झालेलं नाही, असे स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र दुसरीकडे काही कलाकार मंडळीनी करण जोहरच्या घरी होणाऱ्या पार्टीमध्ये सर्रास अमली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी केली गेली होती. त्या तपासणी अहवालात हा व्हिडीओ खरा असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

त्यामुळे आता करण जोहर अडचणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण जोहरचीही चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज अँगलसमोर आला होता. हे ड्रग्ज कनेक्शन प्रकरण बॉलिवूडपर्यंत पोहोचलं आहे. नुकतंच धर्मा प्रोडक्शन्सचे संचालक निर्माता क्षितीज प्रसाद याची एनसीबीने चौकशी केली होती. जवळपास 27 तास त्याची कसून चौकशी केली गेली. त्यानंतरही झालेल्या चौकशीत त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने क्षितीजला एनसीबीकडून अटक करण्यात आली.

क्षितीजने दिलेल्या माहितीच्या आधारावर मुंबईत चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्याशिवाय क्षितीजच्या चौकशीदरम्यान त्याने अनेक मोठ्या नावांचाही खुलासा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात अनेक बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button