breaking-newsपिंपरी / चिंचवड

भोसरीत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या शिबिरात 329 जणांचे रक्तदान

भोसरी ( महा ई न्यूज ) – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोनच्या वतीने भोसरीतील संत निरंकारी सत्संग भवनात गुरुवारी (दि.20) सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात आले. ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी आणि औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी ६२९ युनिट रक्त संकलन केले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते झाले. या शिबिरास माजी आमदार विलास लांडे , डॉ. प्रभाकर तावरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

संत निरंकारी मंडळामध्ये रक्तदानाची सुरवात १९८६ पासून झाली, एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये १६ रक्तदान शिबीर संपन्न झाली आहेत या मध्ये ५३४६ युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे, मार्च २०१९ पर्यंत उर्वरित ६ शिबीर संपन्न होणार असून साधारणतः ९००० युनिट रक्त संकलित होईल अशी माहिती फाऊंडेशन च्या माध्यमातून देण्यात आली.

 तसेच सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत सर्व संतांनी आध्यात्मिक सत्संग सोहळ्याचा आनंद घेतला. संत निरंकारी मंडळाचे भोसरी सेक्टर चे संयोजक अंगद जाधव यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यास सेवादल,चॅरिटेबलच्या सर्व स्वयंसेवकांचे योगदान लाभले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button