breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमधील नफावसुली कायम

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनंतर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमधील नफावसुली कायम आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेची सुमार कामगिरी आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरील कोरोनाचे संकट यामुळे फेडरल रिझर्व्हने पुढील तीन वर्ष व्याजदर शून्यावर ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

आज म्हणजे 17 स्पटेंबर गुरुवारी कमॉडिटी बाजारात पुन्हा एकदा सोने आणि चांदीमध्ये नफावसुली झाली आहे. गुरुवारी सकाळी बाजार उघडताच सोने दरात ३३४ रुपयांची घसरण झाली. चांदीमध्ये ८५३ रुपयांची घसरण झाली आहे. मागील दोन आठवडे स्थिर असलेल्या सोने आणि चांदीकडे गुंतवणूकदार पुन्हा आकर्षित झाले होते. सलग तीन सत्रात कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली होती.

आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीमध्ये सकाळपासून घसरण सुरु आहे. सध्या सोन्याचा भाव ३७६ रुपयांनी घसरला असून तो ५१४४८ रूपये झाला आहे. चांदीचा भाव प्रती किलो ६७८६५ रुपये आहे. त्यात ९१६ रुपयांची घसरण झाली आहे. याआधी बुधवारी सोने ०.१ टक्क्यांनी वधारले होते. मंगळवारी बाजार बंद होताना सोने ३७३ रुपयांनी महागले होते तर चांदीच्या किमतीत ३९० रुपयांची वाढ झाली होती.

मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०९५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५१५९० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०४१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५४९९० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०९१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३६१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४६० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३९६० रुपये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button