breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

खळबळजनक! पाकिस्तानचा पर्दाफाश, आयएसआयचा अधिकारीच हिजबुल दहशतवादी संघटनेचा प्रमुख

इस्लामाबाद: पाकिस्तानची गुप्तचर संस्था आणि दहशतवादी संघटनांची मिलीभगत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालेलं आहे. भारतीय गुप्तचर संस्थेंच्या हातात काही पाकिस्ताचे कागदपत्रं लागलेली आहेत. यात हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन हा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयचा अधिकारी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. या कागदपत्रांमुळे त्याला पाकिस्तानमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय कोठेही फिरता येत होतं. वृत्तानुसार, ही कागदपत्रं गुप्तचर विभागाने प्रकाशित केली आहेत. यात म्हटलेलं आहे, की मोहम्मद युसुफ शाह उर्फ सय्यद सलाहुद्दीन आयएसआयचा अधिकारी आहे. त्याच्या वाहनाला सुरक्षा तपासणीसाठी कोठेही जाण्याची गरज नाहीय. हे पत्र आयसआयचे संचालक वजाहत अली खान यांनी काढलेलं होतं. याची वैधता डिसेंबर 2020 पर्यंत आहे.

हिजबुलचा भारतात विस्तारासाठी प्रयत्न सुरु

हे पत्र अशावेळी समोर आलं आहे जेव्हा हिजबुल मुजाहिद्दीन भारतात आपली पाळंमुळं पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय सैन्याने शनिवारी प्रेस कॉन्फरन्समध्ये याबाबत माहिती दिलेली होती. उत्तर काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन संघटना सक्रीय झालेली दिसत आहे. या भागात हिजबुल आपला बेस तयार करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करत असल्याचं यावरुन दिसत आहे, अशी माहिती सैन्याने दिलेली आहे. भारतीय गुप्तचर संस्थांनी हा मोठा पुरावा असल्याचं सांगितलेलं आहे. यामुळे आयएसआयचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं स्पष्ट होत आहे. आयएसआय दहशतवादी संघटनांसोबत मिळूनच भारतात घातपात करत असल्याचाही आरोप यामुळे होत आहे. भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी या संघटनांना आयएसआयकडून निधी मिळतो. सलाहुद्दीन हिजबुलसोबतच यूनाटेड जिहाद काउंसिलचाही (UJC) प्रमुख आहे. ही लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित संघटना आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button