breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कमर्शियल स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ३२ रुपयांनी महागला

नवी दिल्ली – तेल कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात ३२ रुपयांची वाढ केली आहे. मात्र सामान्य नागरिकांना दिलासा देताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या अनुदानित आणि विनाअनुदानित या दोन्ही प्रकारच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. हे दर ऑगस्ट-सप्टेंबरप्रमाणे कायम आहेत.

कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात ३२ रुपयांची वाढ केल्यामुळे राजधानी दिल्लीत १९ किलोचा हा एलपीजी स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर १,१६६ रुपये झाला आहे. यापूर्वी तो १,१३३ रुपये ५० पैशांना होता. घरगुती वापराच्या अनुदानित आणि विनाअनुदानित १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. हा सिलिंडर ५९४ रुपयांना आहे. मुंबईत कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपये ५० पैसे एवढी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत हा सिलेंडर १.११३ रुपये ५० पैसे झाला आहे. यापूर्वी त्याची किंमत १,०८९ रुपये होती. कोलकात्यात २४ रुपये आणि चेन्नईत २६ रुपये एवढा कमर्शियल गॅस सिलिंडर महाग झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button