breaking-newsमहाराष्ट्र

कत्तलीसाठी जाणाऱ्या ३५ बैलांना जीवदान

  • संतप्त शेतकऱ्यांकडून टेम्पोची तोडफोड 

नांदेड : नांदेड तालुक्यातील सुगाव-थुगाव शिवेवर एका टेम्पोतून कत्तलीसाठी जाणाऱ्या ३५ गोवंशांचा शेतकऱ्यांच्या सतर्कतेने जीव वाचला असून यानंतर संबंधित वाहनाची तोडफोड करून शेतकऱ्यांनी आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले.

सुगाव-थुगाव शिववेवर वक्फ बोर्डाची जवळपास ३५ एकर जमीन आहे. या जमिनीवर एक शेड  बांधण्यात आले असून येथून गोवंशांची तस्करी केली जात होती. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास एकाच टेम्पोतून ३५ बल कत्तलीसाठी आणले होते. त्यामुळे काही बैल जखमी झाले होते. याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी घटनेची माहिती लिंबगाव पोलिसांना दिली. तेवढय़ाच तत्परतेने पोलीसही घटनास्थही दाखल झाले. जखमी बैलांवर उपचार करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक बी. एल. देशमुख यांनी नाळेश्वर व वाघी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नाळेश्वरच्या पशुवैद्यकीय अधिकारी अश्विनी खरवडकर, पी. यू. देशमुख यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत जखमी बलांवर उपचार केले. त्यानंतर पोलिसांनी टेम्पोतील सर्वच बल आपल्या वाहनांनी लिंबगाव पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी मोठा बंदोबस्त तनात केला होता. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, प्रकाश शेळके, शरद मरे व पांचाळ यांच्यासह मोठा फौजफाटा उपस्थित होता. या प्रकरणातील तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button