breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ज्येष्ठ नागरिक संघ आणि अग्रसेन रुग्णालयाच्या वतीने दिनदुबळ्यांना दिवाळी साहित्य भेट

पिंपरी / महाईन्यूज

जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री अग्रसेन क्लिनीक मोफत धर्मदाय दवाखाना यांनी संयुक्तपणे  दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सणानिमित्ताने विद्यानगर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक  महिलांना माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांच्या हस्ते साडी आणि भेट वस्तुंचे वाटप केले. मोठ्या संख्येने महिलांनी याचा लाभ घेतला.

कोरोना संसर्ग परस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान संकटात सापडले आहे. आर्थिक चणचण भासू लागल्याने यावेळची दिवाळी साजरा करणे नागरिकांना सुकर व्हावे, यासाठी त्यांना आवश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

विद्यानगर प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने श्री अग्रसेन क्लिनिक, मोफत धर्मदाय दवाखाना आणि जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मोफत रक्त, लघवी तपासणी शिबिर घेण्यात आले. यातील रुग्णांवर अनुभवी वैद्यकीय डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार  करण्यात येत आहेत. रोज सकाळी आणि दुपारच्या सत्रात 40 ते 50 रूग्ण नागरिक उपचार घेत आहेत.

मोफत रक्त, लघवी तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. हा उपक्रम घेण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष देविचंद किशनलाल अग्रवाल, डाॅ. संतोष अग्रवाल, डाॅ. शितल कुंभार (ढवळे) , डाॅ. निलोफर सिकिलकर, डाॅ. रमेश बन्सल, प्रकाश बाबर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, उपाध्यक्ष शिवाजी माने, खजिनदार श्रीशैल जिडगे, सचिव जयवंत थिटे तसेच संघाचे पदाधिकारी, सभासदाचे सहकार्य लाभले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button