breaking-newsमहाराष्ट्र

तिवरे भेंदवाडीचा वीजपुरवठा सुरळीत

  • धरण दुर्घटनेतील मृतांची संख्या १९

रत्नगिरी – दोन दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर तालुक्यातील तिवरे या धरण दुर्घटनाग्रस्त गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

दरम्यान,   या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ग्रामस्थांपैकी रेश्मा रवींद्र चव्हाण (वय ४८ वर्षे) यांचा मृतदेह शुRवारी सापडला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १९ झाली असून आणखी ३ बेपत्ता व्यक्तींचा शोध चालू आहे.

गेल्या मंगळवारी येथे झालेल्या  धरण फुटीमध्ये महावितरणचे तब्बल सव्वीस वीज खांब वाहून गेले होते. परिणामी तिवरे येथील भेंदवाडीचा व फणसवाडीचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरण कर्मचारम्य़ांनी दोन दिवस युध्दपातळीवर केलेल्या प्रयत्नंमुळे हा वीजपुरवठा सुरळीत केला आहे.

भेंदवाडीला महावितरणच्या गाणेखडपोली येथील वीज उपकेंद्रातून ११ केव्ही तिवरे वाहिनीद्वारे वीजपुरवठा होतो. २ जुलैच्या रात्री तिवरे धरणाला भगदाड पडून भेंदवाडी उध्दवस्त झाली. यामध्ये उच्चदाबाचे  ४ व लघुदाबाचे २२ असे २६ वीज खांब तारांसह वाहून गेले. रोहित्र, रोहित्रपेटय़ा व काही वीज खांब असे एकूण साडेसात लाखांचे नुकसान झाले. खांब वाहून गेल्यामुळे भेंदवाडी व पुढे असलेल्या फणसवाडी येथील एकूण ७० ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला. नादुरुस्त झल्याने भेंदवाडी व फणसवाडी वगळता सर्व गावांचा वीजपुरवठा लागलीच पूर्ववत सुरु झाला.

महावितरण कोकण परिमंडलाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे, अधीक्षक अभियंता प्रभाकर पेठकर, चिपळूणचे कार्यकारी अभियंता प्रकाश जमधडे, उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र पालशेतकर यांचेसह पिंपळीचे शाखा अभियंता दिपक गोंधळेकर व त्यांच्या स्थानिक कर्मचारम्य़ांनी ३ जुलै रोजी सकाळी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठीचे प्रय केले. परंतु, प्रतिकूल वातावरणामुळे काम करता आले नाही. दुसऱ्या दिवशी (४ जुलै) पुन्हा सर्व अधिकारी मंडळी व ठेकेदार मे. प्रकाश इलेक्ट्रील्स यांचे ३० ते ३५ कामगार सर्व साहित्यानिशी सकाळी भेंदवाडी येथे पोहोचले आणि पावसाला न जुमानता कामाला सुरूवात केली.

विजेचे खांब उभे करण्यापेक्षा त्याची वाहतूक करणे आव्हानात्मक होते. कारण भेंदवाडीला जाताना नदी ओलांडावी लागत होती. रस्ताही खचलेला होता. त्यामुळे लोखंडी खांब दहा—बाराजणांनी खांद्यवर घेऊ न वाहती नदी ओलांडणे सोपे काम नव्हते. पण या अडचणींवर मात करत दिवसभरात ७ खांब उभे करुन रात्री साडेनऊच्या सुमारास ४३ ग्राहकांच्या वीज जोडण्या सुरू करण्यात यश आले. तसेच शुR वारी (दि. ५) आणखी दोन पोल उभे पोल करुन २ जोडण्या चालू करण्यात आल्या आहेत.

धरणफूटीमुळे ७० वीज जोडण्या बाधीत झाल्या होत्या. यामध्ये दोन पाणीपुरवठा योजनांचाही समावेश आहे. त्यातील एक पाणीपुरवठा येाजना पूर्वीपासूनच बंद होती तर एक मागील दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. याचेही काम केले जाणार आहे. बरीच घरे कायमची उध्दवस्त झाल्याने नामशेष झाली आहेत. त्यामुळे त्यांना वीज जोडणी नेमकी कुठे द्यायची आणि कुणासाठी घ्यायची हा प्रश्न आहे.

मृतांची संख्या एकोणीसवर

दरम्यान  रेश्मा चव्हाण यांचा मृतदेह मालदोली खाडीत शुR वारी आढळून आला. तिसऱ्या दिवशीही तिवरे नदीकाठी शोधमोहीम सुरूच होती. तिवरे येथील पाणी योजनेची विहीर कोसळल्याने योजना बंद आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. भाजप तालुकाध्यक्ष सतीश मोरे यांनी आज पाण्याच्या टँकरची मोफत व्यवस्था केली. तर दोन कंपन्यांनीही सामाजिक बांधिलकीतून टँकर दिले. हायस्कूल मधील बाधित लोकांना नियमित वेळेत भोजन मिळण्यासाठी प्रशासनाने स्थानिक आचाऱ्याची व्यवस्था केली आहे. बाधीतांमध्ये अनेक वयोवृद्धांचा समावेश आहे. त्यांची प्रकृती स्थिर राहावी, यासाठी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत आहे.

भेंदवाडीतील ग्रामस्थांच्या ४० गायी व २५ बकऱ्या वाहून गेल्या आहेत. दुर्घटनेत सुखरूप राहिलेल्या गायी म्हैशींची व्यवस्था धरण माथ्यावरील पाटबंधारे विभागाच्या नादुरुस्त इमारतीत करण्यात आली. पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या गुरांवर उपचार केले आहेत. पुढील काही दिवस प्रशासनाकडून गुरांच्या चाऱ्याची व्यवस्थाही केली जाणार आहे.

तिवरे धरणाच्या दुर्घटनेत नदीकाठच्या लोकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये शेती, इमारती आदींचा समावेश आहे. उद्यापासून नदीकाठच्या गावांचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक संयुक्तरित्या करणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन देसाई यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button