breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समितीकडून विविध विकास विषयक कामांना मंजूरी

पिंपरी, ( महा ई न्यूज ) – शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत करण्यात येणारे रस्ते, पावसाळी पाण्यासाठी वाहिनी व इतर स्थापत्य विषयक कामे, पूल, स्काय वॉक, आणि इमारतीचे कामासाठी एक्सप्रेशन ऑफ इंट्रेस्ट ची निविदा प्रसिध्द करणेत आली होती. त्यास अनुसरुन टप्पा १ मध्ये २५ इच्छुक सल्लागारांना सहभागी करण्यात आले होते. टप्पा २ मध्ये सल्लागार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करुन मे. ऍश्युअर्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांना श्रेणीवाढ करणेस मान्यता देण्यात आली.

ह क्षेत्रीय कार्यालयाकडील विद्युत विषयक निविदा कामांच्या नियमानुसार व निविदा अटी-शर्ती प्रमाणे लघुत्तम दराच्या निविदा स्विकारणेत आलेल्या असून मंजुर दराने ठेकेदारा समवेत करण्यात आलेल्या करारनाम्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठीच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालयाकडील विद्युत विषयक निविदा कामांच्या नियमानुसार व निविदा अटी-शर्ती प्रमाणे लघुत्तम दराच्या निविदा स्विकारणेत आलेल्या असून मंजुर दराने ठेकेदारासमवेत करण्यात आलेल्या करारनाम्यास मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button