पिंपरी / चिंचवड

नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना भाजपातर्फे अभिवादन

– मोरवाडीतील पक्षकार्यालयात प्रतिमा पूजन

– भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती

पिंपरी l प्रतिनिधी

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड भाजपाच्या वतीने दोन्ही महामानवांना अभिवादन करण्यात आले.

पिंपरी- मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, विजय फुगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, उपाध्यक्ष नंदकुमार दाभाडे, गणेश ढाकणे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल, उद्योग आघाडी अध्यक्ष निखिल काळकुटे, अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश चिटणीस कोमल शिंदे, चिटणीस रवी नांदूरकर, गुजराथी आघाडी अध्यक्ष मुकेश चुडासमा, दिव्यांग सेल अध्यक्ष शिवदास हांडे, सुजित आगरकर, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष सुभाष सरोदे, नंदू कदम, नेताजी शिंदे, अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस संतोष रणसिंग, यशवंत दणाने, प्रभाग अध्यक्ष अजिंक्य गोळे, बाजीराव मोरे, शरद वाघ, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष जयदीप करपे, रुपेश चांदेरे, रवी सातपुते आदी उपस्थित होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती झाली. त्यांच्या जयंती दिवसाला पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्ययुद्धात सुभाषचंद्र बोस यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्व होते. त्यांनी 40 हजार भारतीयांची आझाद हिंद फौज बनवून इंग्रजांच्या विरोधात महत्वाच्या लढाया लढल्या. हुकूमशहा हिटलर याने त्यांना नेताजी म्हणून प्रथम संबोधित केले होते.

तसेच, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 96 वी जयंती झाली. राजकारण, समाजकारण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात त्यांनी मुक्तसंचार केला. यानिमित्त दोन्ही महामानवांना सर्वत्र अभिवादन करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button