breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महत्वपूर्ण अपडेट! ‘नेट’ प्रमाणे ‘सेट’ही वर्षातून दोनदा होणार

Set Exam : राज्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सेट ही परीक्षा घेतली जाते. मात्र ही परीक्षा वर्षातून एकदाच होत असल्याने भावी प्राध्यापकांना वाट पाहावी लागत होती. मात्र आता ज्याप्रमाणे देश पातळीवरील सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची नेट ही परीक्षा वर्षातून दोनदा होते त्याप्रमाणे सेट ही परीक्षा देखील वर्षातून दोनदा होणार आहे.

नेमका प्रकार काय?

याबद्दल विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीने गठित केलेल्या समितीच्या निर्णयांच्या आधारे हे नवे बदल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून घेतली जाणारी सेट ही परीक्षा आतापर्यंत ऑफलाईन घेतली जात होती. मात्र आता ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.

हेही वाचा – ‘२०१४ला देशाला लागलेली पनवती २०२४ला दूर होणार’; ठाकरे गटाचा टोला

मात्र यंदा होणारी सेट परीक्षा ऑफलाईनच असणार आहे. ही सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून घेतली जाणारी शेवटची ऑफलाईन सेट परीक्षा असणार आहे. त्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान राज्यात होणाऱ्या इतर ऑनलाईन परीक्षांचा गोंधळ पाहता अद्याप देखील सेट परीक्षा ऑनलाईन घ्यायची की, नाही याचा विचार सुरू आहे.

दरम्यान, ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा आमचा विचार असल्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button