breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
कंगना रनौतच्या याचिकेवर उद्यापासून सुनावणी, संजय राऊतांना मात्र 1 आठवड्याची मुदत
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिनं दाखल केलेल्या याचिकेवर उद्यापासून मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेनं (BMC)वांद्रे येथील पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयात पाडापाडी केली होती. या कारवाईविरोधात कंगना हायकोर्टात धाव घेतली होती.
तर शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई महापालिकेला याप्रकरणी उत्तर देण्यासाठी हायकोर्टानं एक आठवड्याची मुदत दिलेली आहे. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी मुंबई महापालिकेच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी दुपारी सुनावणी होणार आहे.