breaking-newsपिंपरी / चिंचवड

जयंती महोत्सवानिमित्त मंगळवारी भीमगितांचा कार्यक्रम – शेखर ओव्हाळ

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक व जयंती महोत्सवाचे आयोजक शेखर ओव्हाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.

जयंती महोत्सवांतर्गत मंगळवारी (दि. 21) सायंकाळी 6 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील पटांगणावर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवा नेते पार्थ पवार, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी आमदार आण्णा बनसोडे, विलास लांडे, ज्येष्ठ नेते माजी महापौर आझम पानसरे, डीबीएन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक निकाळजे, उद्योजक नानासाहेब गायकवाड, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या आयोजनात माजी उपमहापौर ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, रोहित काटे, जावेद शेख, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, युवा उद्योजक गिरीष जाचक, सुशांत केंजळे, युवा नेते संदीप ढेरंगे, गणेश कदम आदींनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती आयोजक शेखर ओव्हाळ यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button