breaking-newsताज्या घडामोडी

औरंगाबादचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद | शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे पश्चिम विधानसभा संघटक सुशील खेडकर यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. आमदार शिरसाट आणि सुशील खेडकर यांच्यात सातारा देवळाईतील रस्ते कामाच्या कंत्राटावरून जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले.

मागील अनेक दिवसांपासून आमदार शिरसाट आणि पश्चिम विधानसभा संघटक सुशील खेडकर यांच्यात सातारा देवळाईतील रस्ते कामाच्या कंत्राटावरून वाद सुरु आहे. यातूनच शनिवारी दुपारी कोकणवाडी येथील आमदार शिरसाट यांच्या कार्यालयासमोर दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. या घटनेत खेडकर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार शिरसाट यांच्या जखमी समर्थकांनी देखील घाटीत जाऊन उपचार घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button